स्वार्थ त्याग की कठीण तपस्या..

0
  • प्रवचन सारांश  –  3 ऑगस्ट 2022

जिनवाणी आपल्याला स्वार्थाकडून परमार्थाकडे घेऊन जाते. श्रावकांच्या गुणांमध्ये ‘परमार्थ’ हा गुण असावा लागतो. परमार्थ याचा अर्थ त्यासाठी माहिती असणे आवश्यक आहे. परमार्थ या शब्दाची फोड केली असता, ‘परम’+‘अर्थ’ अशी फोड करता येते. (अर्थ म्हणजे उद्दिष्ट, धन-पैसा, प्रयोजन, नियोजन) होय. परमार्थ म्हणजे मोक्ष प्राप्तीचे उद्दिष्ट. स्वार्थ, परार्थ आणि परमार्थ अशा तीन श्रेणी असतात. मानवी जन्माच्या तर चार अवस्था असतात. स्वार्थ त्याग करून परमार्थ लहानपणीच करण्याची सवय लावायला हवी. जसे सरोवर, तरुवर, संतजन आणि मेघ यांचे जीवनच परमार्थासाठी बनलेले असते. स्वार्थ त्यागला तर सर्व सुरळीत होऊन जाईल. परंतु स्वार्थ त्याग फार कठीण तपस्या आहे असे डॉ. पदमचंद्रमुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी ‘मेरी भावना’  प्रवचन मालिकेतील आजच्या प्रवचनात सांगितले.

हे देखील वाचा :-

चार संसारी ‘प’ दुःखकारक तर आध्यात्मिक ‘प’ सुखकारक

जळगाव येथील स्वाध्याय भवनात जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात पू. जयपुरंदर मुनी यांची ‘मेरी भावना’ तर पू. जयधुरंधर मुनी यांची ‘आगम शास्त्र’ विषयी प्रवचन मालिका सुरू आहे.

स्वार्थ त्यागाबद्दल त्यांनी महाभारतमधील बकासूर आणि भीम यांची अख्यायिका सांगितली. त्याच प्रमाणे ‘कर भला तो हो भला’ ही रंजक गोष्टही सांगितली. एका गावात एक गरीब युवक आणि त्याची आई राहत असते. परिस्थिती सुधारण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले परंतु त्यांना यश मिळाले नाही. 100 मैलावर एक सिद्धपुरुष परिस्थिती केव्हा सुधारेल हे सांगतात. त्यामुळे पायीच तो युवक सिद्धपुरुषाकडे निघाला. चालून, प्रवास करून थकला होता. मी माझा प्रश्न विचारण्यासाठी एका सिद्ध पुरुषाकडे निघालो असे त्याने ज्या घरात आसरा घेतला तेथील मालकिणीला सांगितले. तिथे एक कन्या मुकी होती. ती केव्हा बोलेल? हा प्रश्न ही विचारून घे, नंतर एक साधू त्याला भेटला माझे साधुत्व केव्हा साध्य होईल? एका शेतकऱ्याला शेतात डाळिंब लावायचे असते ते पण ते लागत नाही. ते केव्हा लागेल? सिद्ध पुरुष फक्त 3 प्रश्नचे समाधान देतात. स्वतःचा प्रश्न बाकी ठेवून तिघांच्या प्रश्नाचे उत्तर मिळविले. शेतकऱ्याला सांगितले ज्या जागेवर तू झाड लावतो त्या जागेत सोन्याचे हंडे आहेत, शेतकऱ्याने अर्धे सोने त्या युवकाला दिले. साधुला उत्तर दिले की तुझ्या जटेमध्ये 2 रत्न आहे ते काढून टाक साधुत्व सिद्ध होईल ते रत्न त्याला मिळाले. कन्येचा नवरा समोर आला की ती बोलू लागेल. हा युवक कन्येसमोर गेला व कन्या बोलू लागली. कर भला तो हो भला दुसऱ्यांचे भले करण्यात आपलेही भले होते. असे प्रवचनात सांगितले.

आगमशास्त्र प्रवचन मालेत पू. जयधुरंधर मुनी यांनी सांगितले की, धर्मध्यान करण्याचे सुयोग्य वय हे तरुणपण असते. परंतु तरुणपणी धन कमावण्यात माणूस व्यस्त होतो. जोवर वृद्धत्व, आजारपण, रोग येत नाही तसेच जोवर व्यक्तीत वेळ, समज आणि शक्ती असते तोवर धर्म ध्यान करणे आवश्यक असते असे आगम शास्त्रात मार्गदर्शन केले आहे. सूर्योदय, दुपार, संध्याकाळ व रात्र अशा काळाच्या अवस्था असतात. त्याप्रमाणेच जन्म, बालपण, तारुण्य, वृद्धत्व ह्या मानवी जीवनाच्या चार अवस्था असतात. जोवर वेळ, शक्ती, समज आहे तोवर धर्म ध्यान करा असे आवाहन आजच्या प्रवचनात केले गेले.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका  दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…..

 

Leave A Reply

Your email address will not be published.