अतिमुक्त कुमार यांचे चरित्र प्रेरणादायी

0

प्रवचन सारांश – 30/08/2022 

राजकुमार असून इतके मोठे राजवैभव, आई-वडिलांचा त्याग करून आत्म्याला जन्म मरणाच्या फेर्‍यातून कसे वाचावे हे चांगल्या प्रकारे ठाऊक होते. आपणासाठी अतिमुक्त कुमार यांचे चरित्र प्रेरणादायी ठरलेले आहे. ते भगवान गौतम स्वामी, भगवान महावीर यांच्या सान्निध्यात आले आणि त्यांचे जीवन उजळले आहे. असे महत्वाचे विचार डॉ. पदमचंद्र मुनी यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले. आजचा विषय त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.

‘जाणासि तं चैव न जाणासि, जं चेव न जाणासि तं चैव जाणासि’ हे अतिमुक्त कुमार यांनी आपल्या आई वडिलांना सांगितले ते एका वाक्यात सांगितले. या एका वाक्याच्या महत्त्वाला अनेक उदाहरणे देत डॉ. पदमचंद्र म. सा. यांनी ‘अंतगढ़ दसासूत्र’ वाचनातीत आज वाचन करण्यात आलेल्या वर्ग ६ व १५ व्या अध्ययन मध्ये आई, वडील आणि अतिमुक्त कुमार यांची अख्यायिका समजावून सांगितली. जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे  जयगच्छाधिपती 12 के पट्टधर पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदी ठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रमात पवित्र असा पर्युषण महापर्वाचा कार्यक्रम सुरू आहे.

पोलासपुर नगरात विजय नावाचे राजा व श्रीदेवी महाराणी होती. त्यांना एक मुलगा होता ज्याचे नाव अतिमुक्त कुमार असते. त्या नगरामध्ये श्रीवन उद्यान असते. त्यावेळी श्रमण भगवान महावीर त्या उद्यानात आले. अतिमुक्तकुमार त्या उद्यानात आपल्या मित्रांसमवेत खेळत असतात. त्यांची भगवान गौतम यांच्याशी भेट झाली. प्रश्न विचारला गेला, ‘आपण कोण आहात? या नगरात का फिरत आहात?’ त्यावर अतिमुक्त कुमार यांना उत्तर दिले, ‘आम्ही श्रमण-निर्ग्रथ, इर्ष्यासमिती धारक ब्रम्हचारी आहोत. नगरात भिक्षा मागण्यासाठी फिरतो आहोत. भिक्षा मागण्यासाठी ते आले आहेत हे समजल्यावर त्यांना आपला बोट धरून अतिमुक्त कुमार आपल्या घरी घेऊन आला. भिक्षा दिली. राणी श्रीदेवी यांनी आदरातीथ्य केले, जेवण दिले. अतिमुक्त कुमार यांनी भगवान महावीर यांना भेटून वंदन केले. त्यांनी अतिमुक्त कुमार यांजा कथा सांगून उपदेश दिला. त्यावर प्रभावीत होऊन अतिमुक्त कुमार यांच्या मनात दीक्षा भाव निर्माण झाले.

दीक्षा घेण्यासाठी आई-वडिलांची अनुमती मागावी लागते, त्यांनी संमती दिली तर दीक्षा घेता येईल. अतिमुक्त कुमारनी आई-वडिलांना विचारले. त्यावर, ‘तू अजून लहान आहेस’. असे उत्तर मिळाल्यावर अतिमुक्त कुमार व आई-वडिलांचा संवाद होतो. तो संवाद अत्यंत महत्वाचा ठरतो. “माता-पिता, जन्माला आलेल्याला मृत्यू अटळ आहे. जन्म-मृत्युची साखळी पासून मुक्त व्हायचे कसे हे मी जाणतो. पण जाणत नाही, ज्याला जाणत नाही त्याला जाणू शकतो.” त्यावर आई वडिलांनी पुत्राकडे एक मागण केले ते असे की, ‘हे पुत्र, एक दिवसासाठी तुझी राजलक्ष्मी शोभा आम्हाला बघायची आहे!’ अतिमुक्त कुमार यांनी आई वडिलांची इच्छा पूर्ण केली.

त्यानंतर दीक्षा घेऊन तप, ११ अंगांचे अध्ययन केले. गुणरत्न तप, धाराधना करून अतिमुक्त कुमार  विपुलाचल पर्वतावर सिद्ध झाले. त्यांनी जन्म मरणाचा फेरा टाळला. या पर्युषण पर्वामध्ये तप, आराधना करून तुम्ही आपल्या आत्म्याला उन्नत करावे असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी उपस्थितांना प्रवचनातून केले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.