तूप होते खूप… तरी मिळाले नाही रुप(ये)

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

जळगाव दुध उत्पादक संघात घडामोडींचे जणू सत्रच सुरु आहे. त्यातच भरातभर म्हणून जळगाव दुध उत्पादक संघाच्या कर्मचा-यांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातील फसवणूकीचा प्रकार उघड झाला आहे. यापुर्वी देखील असे प्रकार होत असावेत काय? अशी शंका यानिमीत्ताने जनतेच्या मनात व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, प्रशासक समितीची परवानगी न घेता जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीत यांच्या मालकीचे 1800 किलो तुप परस्पर 85 रुपये दराने विठ्ठल रुख्मिनी या एजन्सीला 1 लाख 53 हजार रुपये किमतीत विक्री केल्याच्या आरोपाखाली निखील सुरेश नेहेते (रा. दादावाडी,खोटेनगर.जळगाव) आणि इतर कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दुध उत्पादक संघाचे विस लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाल्याचे म्हटले गेले आहे.

याप्रकरणी शैलेश सुरेश मोरखडे रा. स्टाफ क्वार्टर विकास डेअरी दूध फेडरेशन जळगाव यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशन मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांचे मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.