झूट कभी नही कहा करू..

0

प्रवचन सारांश- 17/08/2022

‘हित’ ‘मीत’ ‘पथ्यम’, ‘सत्यम्’ अशा ४ गुणांनी जिनवाणी युक्त असते. श्रावक-श्राविका यांचा दृढ श्रद्धा, विश्वास जिनवाणीवर असतो. सत्य हेच भगवान असे आगम शास्त्रात सांगण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्र असो आत्मविश्वासाची आवश्यकता असते. तोच आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘मेरी भावना’ अशी रचना खूपच फलदायी ठरते. ‘झूठ कभी नहीं कहा करूँ।” या ओळीचा अर्थ आजच्या प्रवचनात सांगितला गेला, ‘मेरी भावना’ प्रवचन श्रृंखलेत डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी प्रवचन प्रस्तूत केले.

जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरु आहे. त्यामध्ये‍ पू. जयधुरंधर मुनी ‘आगम शास्त्र’ आणि पू. जयपुरंदर मुनी यांची ‘मेरी भावना’ प्रवचन मालिका सुरू आहे.

एका नगरात दुष्काळ पडतो. पाऊस पडण्यासाठी सर्व नगर मिळून प्रार्थना करतात. एक मुलगा सोबत छत्री घेऊन येतो. त्याच्या या कृतीबद्दल सर्वच आश्चर्य व्यक्त करतात व विचारतात ‘अजून पाऊस पडायला ठिकाणा नाही, तू छत्री घेऊन आलास !’ त्यावर तो मुलगा म्हणाला की, ‘आपण प्रार्थना करतो आहोत ना नक्की पाऊस पडेल.’ याला म्हणतात प्रार्थनेवर असलेला दृढ विश्वास ! ‘क्रोध’, ‘लोभ, ‘भय’ आणि ‘हास्य’ अशा या चार कारणांसाठी खोटे बोलले जाते. लोक व्यवहारात पदोपदी खोटे बोलले जाते. खोटे का बोलतो यावर चिंतन करायला हवे. खोटे बोलू नये असे आवाहन करण्यात आले.

व्यक्तिमत्वाची खरी ओळख त्याच्या बोलण्यातून होते. अचक्षु अर्थात अंध व्यक्ती देखील समोरच्याला न बघता केवळ बोलण्यातून त्याच्या स्वभावाची पारख करून घेऊ शकतो. अंध व्यक्ती एका नगरामध्ये आली होती. राजा, कोतवाल, सामान्य व्यक्ती त्याच्या बोलण्यातून ती व्यक्ती ओळखते. बोलण्यात नियंत्रण असावे. द्रौपदी, कैकयी या राण्यांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवले असते तर महाभारत, रामायण घडले घडले असते का ? आगम शास्त्रात 8 वचन व्यवहार सांगण्यात आलेले आहेत. याबाबत डॉ.पू. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयधुरंधर मुनी यांनी वचन व्यवहाराबद्दल सांगितले. बोलण्याच्या विवेक बदल सांगितले. श्रावकाने कमी बोलावे, गोड बोलावे. खाण्यात गोड आवडते तर बोलण्यात मात्र कडू बोलने सुरू असते. वचन व्यवहारात कसे बोलावे ? या बद्दल लोक व्यवहारातील उदाहरणे त्यांनी प्रवचनात सांगितले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.