राम चिंतीत जावा

0

चिंतन ही प्रक्रिया आहे एखाद्या विषयावर केलेले सखोल विचार, त्याविषयीचे सर्व पैलू विचारात घेऊन मनापासून त्यावर सखोल विचार करणे म्हणजे चिंतन चिंतनाने मनाची शुद्धी होते. कारण चिंतनाच्या विषयाशिवाय दुसरा विचारच मनात नसतो. समर्थानी हाच धागा पकडून उपदेश केला की..

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

रामाचे चिंतन केव्हा करावे तर प्रभात समयी प्रत्येक पहाट म्हणजे जीवनाची पुन्हा नव्याने सुरुवात, नव्याने मांडणी आणि आपल्याला मिळालेले पुन्हा एक दिवसाचे समय दान त्या दिवसाच्या प्रारंभाला म्हणजे प्रभात समयाला प्रभू श्रीरामाचे चिंतन म्हणजे एक मानिकांचंन योगच म्हटला पाहिजे. प्रभात समयी जेव्हा मनाचा गाभारा पूर्णपणे रिता असतो अशा वेळी या मनाच्या गाभाऱ्यात रामाची प्रतिष्ठापना करणे व चिंतनातून रामनामाशी एकरूप होणे म्हणजे दिव्या साधनाच आहे समर्थ म्हणतात त्या प्रमाणे..

मुखी राम त्या काम बाधू शकेना।

रामाचे नाम म्हणजे भवसागरातून तरून जाण्याचा एक मार्गच रामाचे रूप मनात साठवताना साधकाची अनुभूती समर्थ आपल्या शब्दात मांडतात.

दीनानाथ हा राम कोदंडधारी।
पुढे देखता काळ पोटी थरारी॥

प्रभू रामाचे चरित्रातून सत्य हाचि धर्म म्हणून सत्याचरण, प्रेमभाव, अशा सद्गुणांचा बोध होतो, रामाचे चिंतन आपले जीवन उजळून टाकील समर्थ म्हणतात त्या प्रमाणे..

सदा सर्वदा राम सन्निध आहे।

मानवी जीवनसर्वांग सुंदर व्हावे त्यात भवतभाव असावा म्हणून भगवंताच्या श्रवण, मनन, चिंतन याचे प्रयोजन आहे. श्रीरामाच्या चिंतनाने आपले जीवन उन्नत करावे म्हणून सर्थ्यांचा उपदेश ध्यानी घ्यावा.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

श्रीराम जय राम जय जय राम

प्रा. नितीन मटकरी
६ पुतळा पार्क अपार्टमेंट
विष्णू नगर जळगाव
९३२६७७८३२

Leave A Reply

Your email address will not be published.