२४ क्विंटल गहू गोडावूनमधून लंपास; गुन्हा दाखल

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव तालुक्‍यातील पिंपळे शिवारातील गोडावूनमधून भामट्यांनी ५० हजार रुपये किंमतीचा २४ क्विंटल गहू लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आह

विनोद प्रकाश पाटील (वय ३७, रा. पिंपरी खुर्द ता. धरणगाव) हे व्यापारी आहेत. त्यांचे धरणगाव तालुक्यातील चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ शगुन कॉटेक्स जिनिंग कंपनीचे गोडावून आहे. याठिकाणी त्यांनी २४ क्विंटल गहू इतर सामान ठेवलेला आहे. दरम्यान २६ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीचे ४० कट्टे असा २४ क्विंटल गहू लंपास केला.

सदर प्रकार बुधवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता समोर आला. याप्रकरणी विनोद पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पवार करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.