लोहारा येथे अवैध दारू विक्रेत्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0

लोहारा ता.पाचोरा/ ;– अवैधरीतल्या देशी मद्याची विक्री करताना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने लोहार बसस्थानक परिसरात आकारवाई केली असून मुद्देमाल हस्तगत केला आहे . या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

येथे बसस्थानकआवार परिसरात पत्र्याच्या टपरीत सागर समाधान कोळी रा.लोहारा हा १६८० रुपयाची देशी टॅंगो पंच दारू बेकायदेशीरपणे विक्री करीत आढळून आल्याने त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५/ई प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नंदू पवार ,गिरीश पाटील यांनी केली यामुळे अवैधपणे दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडून काही तास विक्री थांबली . अशाच प्रकारे अवैध बेकायदेशीरप्रमाणे दारू विक्री यावर लोहारासह परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत रहावी अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.