आरोग्यदायी स्त्रीसखी; शतावरी

0

लोकशाही विशेष लेख

मूळ संस्कृत शब्द शतवीर्या. वीर्य म्हणजे ताकद किंवा कार्यशक्ती. म्हणून माणसाची कार्यशक्ती शतपटीने वाढविते अशी ही वनस्पती.

गुणधर्म

१. मधुर व कडू रस, स्निग्ध व थंड, त्यामुळे पित्तशामक. २. डोळे, हृदय व शुक्रधातूला हितकर आणि गर्भपोषक.

३. सप्तधातूंचे पोषण करणारे उत्तम रसायन ( इथे रसायन याचा अर्थ ‘केमिकल – लॅबोरेटरीत बनवता येते ते ‘ असा नाही, तर रसायन म्हणजे सप्तधातूचे पोषण करणारी द्रव्ये. त्यामुळे बुद्धिवर्धन, बलवर्धन व रोगनाशन यांचे सामर्थ्य मिळते.

४. बुद्धिवर्धक, बलवर्धक व रोगनाशक.

५. शरीरघटकांचा लवकर नाश होऊ देत नाही; परिणामी, वृद्धत्व लांबवते.

उपयोग

१. गर्भपोषक – स्त्री-पुरुषातील वीर्य वाढवते व गर्भधारणेसाठी योग्य स्थिती निर्माण करण्यास मदत करते. भूक सुधारते. त्यामुळे गर्भारपणातील अशक्तपणा लवकर जातो. गर्भाचे योग्य पोषण करते. बाळंतपणानंतर अंगावरील दूध वाढविते व सूज कमी करते.

२. मधुमेह – रक्तातील साखर व चरबी कमी करते. लघवीला साफ होते. यामुळे मधुमेह व कोलेस्टेरॉल वृद्धीवर उपयोगी.

३. स्नायूंच्या समस्या – स्नायूंची लवचिकता वाढते. स्नायूंच्या वेदना व सूज कमी करते आणि मांसाचे पोषण करते. आंत्रवण किंवा अल्सरमध्ये अंत:त्वचेला मऊपणा येतो. शतावरी तेल चोळून लावल्यास स्नायू कणखर बनतात; त्यांचा स्टॅमिना वाढतो.

३) वापरण्याची पद्धती
शतावरी कल्प २ चमचे, एक कप दुधात टाकून, सकाळी व रात्री झोपताना घ्यावे किंवा शतावरी चूर्ण अर्धा ते एक चमचा + दूध १ कप उकळून, साखर – घालून प्यावे – (मधुमेहींनी साखर घालू नये.) रोज दोन वेळा.

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.