३० हजारांची लाच घेणारा पोलिस पंटरसह जेरबंद

0

अमळनेर’= येथील एका बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकाचा डंपर अडवून 30 हजारांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातनू लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यामध्ये अमळनेर पोलिस स्टेशन मधील हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखा पठाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तक्रारदार हे अमळनेर शहरातील रहिवासी असून त्यांचा बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे, अमळनेर पोलीस ठाण्याचे हवालदार घनश्याम पवार यांनी दि ७ जानेवारी रोजी तक्रारदार यांचा डंपर अडविला होता. तसेच त्यांच्याकडे पोलिस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून 30 हजारांची लाच मागितली होती. त्याबाबतची तक्रार तक्रारदाराने धुळे एसीबीकडे केली. त्यानुसार धुळे लाचलुपचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि ९ रोजी लाचेबाबत पडताळणी केल्यानंतर हवालदार पवार यांनी 30 हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर इम्रान खान याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे घनश्याम पवार सांगितल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर घनश्याम पवार यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली.हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केला.

Leave A Reply

Your email address will not be published.