एक लाखाची लाच मागणारा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव ;- नवीन बांधलेल्या त्यांच्या घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली. त्यांना चार लाख ६० हजार रुपयांची दंडाची रक्कम भरली, तरच वीज मीटर मिळेल. असा निरोप कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप याने दिला होता. त्यानुसार तक्रारदारांनी कंत्राटी वायरमनची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली. तडजोडीमध्ये हे प्रकरण १ लाख ४० हजार रुपयांमध्ये मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून मंगळवारी रात्री १० वाजता टॉवर चौकानजीक १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना जगताप याला रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संशयिताला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.
या पथकाने केली कारवाई
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक सुनील वानखेडे, बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने यांच्या पथकाने केली. लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले

Leave A Reply

Your email address will not be published.