जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी १० हजाराची लाच घेणाऱ्या शेख हुसेन शेख बहु (वय ३९, रा. कुऱ्हाड बु. ता. पाचोरा) या न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
तक्रारदाराला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करुन योजनेचा लाभ घेण्यासासाठी माझी पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. तुम्हाला घरकुल मंजूर करुन देतो असे सांगत तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच घेणाऱ्या शेख हुसेन शेख बहु याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील रमाकांत सोनवणे यांनी बाजू मांडली.