निराधार आदिवासीचा विवाह मुख्याध्यापकाच्या स्वखर्चाने संपन्न

0

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथून जवळच असलेल्या कोरपावली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांनी कोरपावलीच्या निराधार आदिवासीचा विवाह सोहळा स्वखर्चाने पार पाडून त्यास आधार दिल्याने मुख्याध्यापक जावेद बाबू तडवी यांचा कोरपावली ग्रामपंचायततर्फे सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास अडकमोल होते. मुख्याध्यापक जावेद तडवी यांनी जुम्मा लतीफ तडवी हा निराधार आदिवासी तरुण लहान असताना वडिलांचे निधन व तेव्हापासून आईचा आजार या व्यापाने तो निराधार झालेला होता. त्याचा विवाह करण्यासाठी जावेद तडवी यांनी लोकवर्गणी अधिक रस व खर्च करीत त्याचा सर्व खर्च स्वतः करून त्याचा विवाह होय मोहरद येथील सुभान तडवी यांच्या कन्या रुक सानवी तिच्याशी दिनांक 13 रोजी पार पाडला.

म्हणून जावेद तडवी यांचा सत्कार आज दिनांक 14 रोजी उर्दू शाळेच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी कोरपावली पंच कमिटीचे जलील पटेल, देशदूत तालुका प्रतिनिधी अरुण पाटील, फिरोज तडवी, आर पटेल तडवी, सत्तार तडवी, आरिफ तडवी, मुख्याध्यापक धनराज कोळी, मर्दान तडवी, किसन तायडे, सलीम तडवी, उपसरपंच हमे दहावी पटेल यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.