मुलीच्या प्रसंगावधानाने अपहरणाचा प्रयत्न फसला…

0

 

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरातील पूर भागात एका शालेय विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तीचे काही महिलांकडून अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. या घटनेमुळे शहरात विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीती पसरल्याचे चित्र आहे.

सविस्तर वूत्त असे की, काही अज्ञात महिलांनी जामनेर पुरा भागातील नामांकित माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीला पळवून नेण्यासाठी तिच्या नाकाला रुमाल लावून बेशुद्ध करण्याच्या बेतात असतांना त्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवत सदर महिलेच्या हाताला कडकडून चावा घेत पळाली आणि आपली आपबिती पिडीत मुलीने शिक्षकांकडे कथन केली. परंतु या दरम्यान अज्ञात महिला पसार झाल्या. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या संदर्भात पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल का केला नाही?  याचबरोबर या घटनेचे वृत्त त्या मुलींच्या पालकांना देखी का सांगितले नाही ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सदर घटनेने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय ही नावलौकिक शिक्षण संस्था असून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शाळेची शिस्त अतिशय कडक असून दोन भागात हि शाळा भरते.  सकाळचे वर्ग सुरू असताना शाळा प्रशासन बाहेर पटांगणात एकाही विद्यार्थीला शाळेच्या आवारात फिरकु देत नाही. विद्यार्थी हे साडेअकरा वाजेपासून शाळेत यायला दाखल होतात. पिडीत मुलगी ही याच शाळेमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकायला आहे. तिचा स्कॉलरशिपचा क्लास असल्याने ती साडेदहा वाजता शाळेत जात असताना, एक नंबर गेटवर काही अज्ञात महिला गाऊन मध्ये तसेच एक दोन महिला साडी मध्ये होत्या. परिसरात प्रत्यक्षदर्शी नसले तरी गाऊन मध्ये व साडी मध्ये असलेल्या महिला या कोण होत्या. अशी चर्चा दिवसभर सुरू होती.

हि घटना एवढी गंभीर असतांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसात या संदर्भात कुठलीही तक्रार दिली नाही. याबाबत मुख्याध्यापकांनी साधा अर्ज दिल्याचे वृत्त आहे. शाळा प्रशासनाने मुलीच्या वडिलांना देखील या घटनेची माहिती दिली नाही. याची खंत मुलीच्या वडीलांनी बोलून दाखवली. पालक शाळा प्रशासनाच्या भरवशावर आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात. त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही शाळा प्रशासनाची असते. शाळा प्रशासनाने कुठलेही सुरक्षारक्षक आतापर्यंत नेमल्याचे दिसत नाही. शाळेच्या आवारात व संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने कोणतेच पाऊल उचलल्याचे दिसत नाही. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली असून, या घटनेमुळे पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.