विजेचा शॉक लागून पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पाचोरा येथील पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या व नांदेड येथे अभियांत्रिकीत शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे हे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देत असतांना ही दुर्देवी घटना घडली.

पाचोरा येथील पोलिस उपाधिक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव आदित्य अशोक महाजन हा गेल्या पाच दिवसांपूर्वी नांदेड येवून गणपतीसाठी घरी आला होता. शहरातील भडगाव रोडवरील पोलिस लाईन या राहत्या घरी सायंकाळी ७ वाजता पिण्याचे पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार चालू करण्यासाठी गेला असता विजेचा आदित्य यास विजेचा जोरदार शॉक लागल्याने मृत्यू झाला.

मयताचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मयत आदित्य यास एक बहिण असून ती पूणे येथे अभियंत्रीकीचे शिक्षण घेत आहे. त्याचे पच्छात आई, वडील, एक बहीण असा परिवार असून त्याचे मृत्यूमूळे पोलिस लाईनीमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने पाचोरा पोलिस लाईनमधील रहिवासी पोलिस कर्मचारी व त्यांच्या परिवाराचा सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असुन पोलिस लाईन परिसर हा विविध कारणांमुळे मृत्यूचा सापळा बनत चालला असुन याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.