धक्कादायक; अपहृत बाळ सापडले भाजपा नेत्याच्या घरात…

0

 

मथुरा, लोकशाही न्युज नेटवर्क;

उत्तर प्रदेशच्या मथुरा स्टेशनवर झोपलेल्या पालकांच्या शेजारी गेल्या आठवड्यात चोरीला गेलेले 7 महिन्यांचे बाळ, 100 किमी अंतरावर असलेल्या फिरोजाबाद येथील भाजप नगरसेवकाच्या घरी सापडले.

ही माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्यांनी मुले चोरून त्यांची विक्री करण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.भाजपच्या विनिता अग्रवाल आणि त्यांच्या पतीने हे मूल दोन डॉक्टरांकडून १.८ लाख रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे. या जोडप्याला मुलगा हवा होता. या जोडप्याला आधीच एक मुलगी आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवरून मुलाला उचलताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्यक्तीसह आठ जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मथुरा येथे रेल्वे पोलिसांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिकारी मुलाला त्याच्या आईकडे सोपवताना दिसत आहेत. आणखी एका दृश्यात, पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टरांकडून जप्त केलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल दाखविण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहम्मद मुश्ताक यांनी सविस्तर निवेदनात सांगितले की, पैशासाठी तस्करी करणाऱ्या टोळीने हे अपहरण केले होते. ते म्हणाले, “दीप कुमार नावाच्या व्यक्तीने मुलाला नेले होते. तो एका टोळीचा सदस्य आहे ज्यात शेजारच्या हाथरस जिल्ह्यात हॉस्पिटल चालवणारे दोन डॉक्टर आहेत. यात आणखी काही आरोग्य कर्मचारीही सामील आहेत. ज्यांच्याकडे हे मूल आहे त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली. घरात आढळून आले, त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांना मुलगा हवा आहे, म्हणूनच त्यांनी हा सौदा केला. अटक केलेल्या नगरसेवक किंवा भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विशेष म्हणजे रेल्वे स्टेशनवर आई-वडिलांसोबत झोपलेल्या मुलाचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ मथुरेचा आहे. प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या मुलाला त्याच्या आईकडून चोरून एक तरुण कसा पळून जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.