आमदारांचा निषेध व शिक्षकांचा फोटो लावण्यास विरोध – शिक्षक भारतीचे निवेदन

0

 

अमळनेर (प्रतिनिधी), लोकशाही न्युज नेटवर्क;

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत अपमानजनक वक्तव्य केले. तसेच शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व शाळांना शिक्षकांचे फोटो A4 साईज पेपरवर वर्गात लावण्याचे आदेश दिले आहेत. उपरोक्त दोन्ही घटनांचा शिक्षक भारती संघटनेने निवेदन पाठवून निषेध नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या कार्याला व अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे व त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करावे. 99.99% शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. केवळ अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. दोषींवर होणाऱ्या कारवाईचे कोणीही समर्थन करणार नाही पण त्यासाठी सर्व शिक्षकांना अपमानित करू नये व आपले गुरुजी मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्याचा निर्णय तातडीने रद्द करण्याबाबत माननीय  शिक्षण सचिव व मा शिक्षण आयुक्त यांना आदेश करावा या संदर्भात शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ,कार्याध्यक्ष आर.जे.पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख, श्रीमती सुनिता पाटील अध्यक्षा महिला आघाडी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.