महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्री पाटलांचा शिवसेने तर्फे निषेध…

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;

महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तसेच महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याने युवासेना, शिवसेना व शिवसेना महिला आघाडी तर्फे नेहरू चौक जळगाव येथे निषेध करण्यात आला.

यावेळी गुलाबराव पाटील यांचे फोटो असलेले बॅनरचे दहन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्याने अश्या प्रकारचे महिलांचे अपमान करणारे वक्तव्य करणे अशोभनीय आहे. गद्दार गुलाबराव पाटील यांनी त्वरित महिलांची माफी मागावी अशी भावना युवासैनिक व शिवसैनिकांनी व्यक्त केली.

याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, समन्वयक अंकुश कोळी उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड, जीलाणी शेख, शिवसेना महिला आघाडीच्या मंगला बारी, नीलू इंगळे, निता सांगोले, मनीषा पाटील, विमल वाणी, गायत्री सोनवणे, शिला रगरे, अन्नपूर्णा बनसोडे, प्रमिला बारी, अल्पसंख्यांक आघाडीचे झाकीर पठाण, युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, पुनम राजपूत, अमित जगताप, जय मेहेता, अभिजित रंधे, अमोल मोरे, महेश ठाकूर, श्रीकांत आगळे, अंकुश कोळी, फरीद खान, ईश्वर राजपुत, किरण भावसार, उमेश चौधरी, प्रीतम शिंदे, मोहसीन पिंजारी मोहसीन शेख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.