मिठाईचे दुकान चालवण्यासाठी ५० हजारांची मागितली खंडणी

0

भडगाव ;- मिठाईचे दुकान चालवायचे असेल तर मला वर्षाचे 50 हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुला पाहून घेईल अशी धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार 27 सप्टेंबर रोजी तालुक्यातील कजगाव येथे घडला असून याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की हीरसिंग जयसिंग राजपूत वय 35 यांचे मिठाई दुकान असून ते चाळीसगाव रोडवरील राहुल हॉटेलच्या समोर कजगाव ता. भडगाव येथे राहतात, आरोपी शेख गणी शेख इस्माईल मन्यार रा. कजगाव ता. भडगाव याने 27 सप्टेंबर रोजी ८ वाजेच्या सुमारास हरसिंग राजपूत यांना धमकी देऊन म्हटले की, तुला तुझे मिठाईचे दुकान चालवायचे असेल तर तू मला वर्षाचे पन्नास हजार रुपये दे अशी मागणी करून खंडणी मागितली. गावात धंदा करायचा आहे की नाही ,माझी मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी वरपर्यंत ओळख असून मला पैसे दिले नाही तर तुला पाहून घेईल, माझ्याशी गाठ आहे अशी धमकी देऊन शिवीगाळ केली म्हणून आरोपी शेख गणी शेख इस्माईल मन्या र याच्या विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला भादवि कलम 385, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक किरण पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.