लोकशाही न्यूज नेटवर्क
इस्त्रायलमध्ये स्टेट ऑफ वॉरची घोषणा करण्यात आली आहे. गाझा स्ट्रीपमधून हमासाच्या दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केल्यांनतर हा निर्णय घेतला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा स्ट्रिपमधून इस्त्रायली भागात मोठ्या प्रमाणात हल्ले करायला सुरुवात केली आहे. इस्त्रायलवर अनेक रॉकेट डागण्यात आले आहे. तसेच दहशदतवाडी इस्त्रायल हद्दीत शिरले आहे. त्यानंतर इस्त्रायलच्या संरक्षण विभागाकडून स्टेट ऑफ वॉरची घोषणा करण्यात आली आहे.
तेथे राजनच्या सर्व नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. लोकांना घराच्या बाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत व घरातच त्यांनी पुढील आदेश येईपर्यंत सुरक्षित रहावे असे सांगण्यात आले आहे. गाझा स्ट्रिपच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. त्यामुळे हमास दहशतवादी संघटना आणि इस्त्रायल लष्करामध्ये संघर्ष होण्याची स्थिती आहे.
इस्त्रायलचे लष्कर मोठी योजना आखात असल्याचे समोर आले आहे. इस्त्रायलकडून सांगण्यात आलंय की, ‘गाझा स्ट्रिपमध्ये हमास दहशतवादी संस्था कार्यरत आहे. देशावर जे हल्ले झाले त्यासाठी ही संघटनाच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांना या हल्ल्याचे परिणाम भोगावे लागतील.’ इस्त्रायलचे सैन्य हमास दहशतवाद्यांसोबत तीव्र संघर्ष सुरु करणार आहे.