धक्कादायक; मालेगावमध्ये चाहत्याने चक्क थिएटरमध्ये फोडले फटाके

0

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रिलीज होण्याआधी ‘जवान’ चित्रपटाची क्रेज खूप जास्त बघायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आज १ महिना पूर्ण झाला असला तरी, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेज कायम आहे. शाहरुख खानने आपल्या दमदार अभिनयाने सर्वच रसिकाचे मन जिंकली आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याची प्रेक्षक वाट्टेल ते करायला तयार असतात. कधी चित्रपट गृहात नाचतांना पहिले आहे. पण नाशिक जवळील मालेगाव मध्ये ‘जवान’ चित्रपट बघायला गेलेल्या एका चाहत्या जे काही केले त्याने सर्वांचाच भुवया उंचावल्या आहे. या चाहत्याने चक्क थिएटरमध्ये फटाके फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शाहरुखच्या स्टारडमची चांगलीच चर्चा होतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.