Friday, May 20, 2022

आपली लायकी आपणच ओळखायची असते; खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यात कायम आरोप प्रत्यारोप सुरु असतात. दरम्यान एकनाथराव खडसेंनी मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी बोलतांना गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -

गिरीश महाजनांची आता स्मरण शक्ती कमी झाली आहे. माझ्या मागेपुढे करणारा माणूस माझे लांगुनचालन करणारा माणूस नाथाभाऊंच्या आशीर्वादाने मोठा झाला. त्याठिकाणी याला कोणी ओळखत नव्हतं. त्यावेळेस भुसावळ मतदार संघ बदलून जामनेर हा शिवसेनेचा होता. भुसावळ भाजपचा होता, तो बदलण्यासाठी प्रमोद महाजन यांच्याकडे मी आग्रह धरला. म्हणून हा मतदारसंघ भाजपकडे आला. याला तिकीट दिलं, निवडून आणलं. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये याने याच्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगावे की, यांनी माझे पाय धरले की नाही, निधीसाठी पैसे द्या पैसा द्या आणि त्याला आर्थिक मदत मी करत गेलो ते सांगावे. आता या गोष्टीमध्ये तो वारंवार सांगतो की कोथळीचा सरपंच कोणाचा माझ्या गावचा पण माझ्या गावचा सरपंच माझ्याच गावचा आहे त्याने येऊन बघावे.

नगरपालिकेच्या नगरसेविका आपल्या नगराध्यक्षा सौभाग्यवती पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, त्याला अजून लक्षात येत नाही पण जळगाव जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी पराभव झाल्यामुळे त्याच मन विचलित झाला आहे. जिल्हा बँकेमधून पळ काढला, उभे केलेत काही ते सर्वजण पडले. एकही उमेदवार निवडून आला नाही. जळगाव महानगरपालिका हातची गेली.

आता अलीकडे सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. माझ्याही मतदार संघामध्ये मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. दहापैकी एकही संस्थेवर भाजप निवडून आला नाही. हा जो पराभव सातत्याने झाले आहेत, त्यामुळे ते विचलित झाले आहेत. नाथाभाऊला कमजोर करण्यासाठी याला शिरजोर केलं. नाथाभाऊ कमजोर झाला पाहिजे म्हणजे याला नेतृत्व मिळेल म्हणून त्यांनी उपद्व्याप केले. नाहीतर यांची काय मजाल आहे ? याठिकाणी चाळीस वर्ष मला जनतेने निवडून दिलं आणि त्याकालखंडात भाजप कुठेही नव्हता. हा सुद्धा नव्हता. त्या कालखंडामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन आणि पक्षाच्या माध्यमातून आशीर्वाद मला मिळाले आणि त्यामुळे मला या ठिकाणी मंत्री होता आले.

मंत्री मी माझ्या ताकदीवर झालो, देवेंद्र तर त्यावेळेस हिशोबातही नव्हता. मंत्री मी याच्या आशीर्वादामुळे झालेलो नव्हतो आणि हा आताच घडलेला फक्त लांगुनचालून, हाजी हाजी करून झालेलं नेतृत्व आहे आणि गिरीश महाजनांच स्वतःच कर्तृत्व काय आहे. अगोदर नाथाभाऊंची हाजी करत होता, आता देवेंद्रजींची करत आहे. आपली लायकी आपणच ओळखायची असते, दुसऱ्यांना सांगायचे नसते असे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या