सावधान.. कौन बनेगा करोडपतीच्या लॉटरीचे आमिष; महिलेला १ लाखात गंडवले

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील टिटवी येथील एका महिलेला २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून एक लाख ८५ हजार रुपयात ऑनलाइन पद्धतीने फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा पारोळा पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे.

तालुक्यातील टिटवी येथील महिलेला नुकतेच कपाशीचे पैसे दोन-अडीच लाख रुपये मिळाले होते. त्यांना दि ५ रोजी मो. क्र. ८४०९४७७४६५ या क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने कॉल करून सांगितले की, आपणास  कौन बनेगा करोडपतीमध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, त्यासाठी आपण आपल्या बॅंकेचे खाते क्रमांक द्यावे, महिलेने आपले बँक ऑफ बडोदा यांच्या खाते क्रमांक सदरील व्यक्तीस दिला.

आपले खाते लहान असून त्याला टॅक्स लागेल यासाठी आपण आपल्याकडील रक्कम या खात्यात जमा करा. नंतर मी पुर्ण रक्कम टाकतो, म्हणून महिलेने आपल्याकडील एक लाख ८५ हजार रुपये सदरील व्यक्तीच्या मोबाईल नंबर वर वर्ग केले. या घटनेनंतर सदरील व्यक्तीच्या मोबाईल नंबर दिनांक ७ पासून बंद झाला. या घटनेत दीपक कुमार नरेश व सौरभ अशा तीन व्यक्तींनी सलग दोन दिवस महिलेच्या व्हाट्सअप वर चॅटींग करत भूलथापा मारल्या.

दरम्यान सदर महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत आपल्या व मुलाच्या मोबाईल वरून आरोपींनी दिलेल्या मोबाईलवर एक लाख ८५ हजार रुपयाची रक्कम वर्ग केली. त्यानंतर दोन दिवसाने सदरील नंबर वर फोन केले असता फोन लागत नसल्याने महिलेस शंका आली तेव्हा या महिलेने दिनांक १० रोजी पारोळा पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली असून पुढील तपास सुधीर पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.