मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या १३७ वाहनचालकावर कारवाई

0

जळगाव ;- ३१ डिसेंबरच्यारोजी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या १३७ वाहनचालकावर डंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहन चालकांकडून अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याने पोलिसांनी मद्यपींची चांगलीच झिंग उतरवली .
मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागतासाठी तरुणाईंकडून मोठ्या प्रमाणात पाट्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेसह विविध पोलिस ठाण्यांतर्गत नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची तपासणी करण्यात
आली. यामध्ये तीन दिवस वाहतूक शाखेने आकाशवाणी चौक, बसस्थानक परिसर व अन्य ठिकाणी वाहनांची तपासणी केली. यामध्ये मद्यपान करून वाहन चालविणारे १९ वाहनधारक आढळून आले. त्यांच्यावर ‘ड्रंक अँड ड्राईव्हअंतर्गतकारवाई करण्यात आली. शहर वाहतुक विभागाकडून तीन दिवस केली कारवाई वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले व त्यांच्यासहकाऱ्यांनी तीनही दिवस रात्रीरस्त्यावर बॅरिकेटस्लावून तपासणी करताना १९ वाहनधारकांना एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गतदेखील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग व शहरातील अन्य भागात ३१ डिसेंबर रोजी तपासणी करण्यात आली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली २३ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तिघांवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची कारवाई करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान ४०० वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वेगवेगळ्या कारवाई अंतर्गत वाहनधारकांना एकूण एक लाख ५६ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला.यामध्ये ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ च्या तीन कारवाया करण्यासह नियमानुसार नंबर प्लेट नसणाऱ्या आठ वाहनधारकांना पाच हजार रुपयांचा दंड, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या दोघांना दोन हजाराचा दंड, ट्रीपल सीट जाणाऱ्या आठ दुचाकीस्वारांना ८०० रुपये दंड, विना हेल्मेटच्या पाच कारवाई करत दोन हजार ५०० रुपये दंड, वाहन परवाना नसणाऱ्या चार वाहनधारकांना २० हजारांचा दंड, सीटबेल्ट न लावता वाहन चालवणाऱ्या पाच जणांना १० हजारांचा दंड, वेगवेगळ्या कारवाई अंतर्गत ४६ जणांना २८ हजार ५०० रुपये दंड, इतर ७७ कारवायांमध्ये ६७हजारांचा दंड करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करुन कारवाई करण्यात आली. फॅन्सी प्लेटसह नियम मोडणाऱ्या ५०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.