जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी ठरवले गेले ड्रेसकोड !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुरी येथील प्रचलित जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर प्रशासनाने ठरवलेले ड्रेसकोड घालून प्रवेश करणे बंधनकारक केले आहे. १ जानेवारी २०२४ पासून या नियमाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात गुटखा आणि पान खाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर प्रशासनाने सोमवारपासून (१ डिसेंबर) मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य केला आहे. त्याचप्रमाणे या मंदिराच्या आवारात गुटखा आणि पान आणि प्लास्टिक आणि पॉलिथिनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने यापूर्वी यासंबंधीचा आदेश जारी केला होता तसेच पोलिसांनाही बंदीची अंबलबजावणी करण्यास सांगितले होते. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी गुटखा आणि पान खाण्यावरही बंदी लागू करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे, मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना योग्य कपडे घालावे लागतील. हाफ पँट, चड्डी, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लिव्हलेस ड्रेस घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

दरम्यान, ड्रेसकोडचे नियम लागू झाल्यामुळे 2024 च्या पहिल्या दिवशी मंदिरात येणारे पुरुष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान केलेले दिसले आणि महिलांनी साडी किंवा सलवार कमीज घातलेले होते

Leave A Reply

Your email address will not be published.