भयंकर: २५ मानवी कवट्या, शेकडो हाडांनी गुप्त पूजा.. पोलीसही हैराण

0

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एका फार्म हाऊसवरती २५ मानवी कवट्या आणि शेकडो हाडे सापडली आहेत. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा धक्कादायक प्रकार  कर्नाटक येथील रामानगर जिल्ह्यातील जोगनहल्ली गावामधील आहे.  बलराम नावाच्या व्यक्तीने हे सर्व गुप्त पूजा करण्यासाठी जमवले होते. हा प्रकार पाहून पोलिस चक्रावले.

.. पाहून लोक घाबरले

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जोगनहल्ली येथे बलराम नावाचा व्यक्ती स्मशान भूमीमध्ये पूजा करत होता. गावातील काही लोकांनी त्याला पाहिले. बलरामला स्मशान भूमीमध्ये पूजा करताना पाहून गावातील लोक घाबरले त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांना स्मशान भूमीमध्ये एक व्यक्ती काळी जादू करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बलरामला ताब्यात घेतले. अशी पूजा का करत आहेस, असा प्रश्न त्याला विचारला असता अनेक खळबळजनक बाबी समोर आल्या. बलरामने दिलेल्या माहितीनंतर त्यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी शोध सुरू केला.

हाडांची खुर्ची आणि पलंग

दरम्यान पोलिसांनी बलरामच्या फार्म हाऊसवर शोध घेतला असता त्याठिकाणी २५ मानवी कवट्या आणि शेकडो मानवी हाडे सापडली आहेत. त्या कवटीवर हळद, कुंकू आणि पांढरे पट्टे दिसत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याने गुप्त पूजेसाठी ते गोळा केल्याचा प्राथमिक तपासात अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. या कवटीचे आणि हाडांचे वय निश्चित करण्यासाठी एफएसएल टीम विशेष चाचण्या करत आहे. हाडांची खुर्ची आणि पलंग पाहून अधिकारीही अवाक् झाले

कवट्या पुर्वजांपासूनच्या 

याप्रकरणी बलरामने सांगितले की, ही हाडे आणि मानवी कवट्या या पुर्वजांपासूनच्या आहेत. तर या मानवी कवट्या आणि हाडे पाच वर्षांच्या आसपासची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हाडे स्मशान भूमीतून गोळा करण्यात आल्याची शक्यता आहे. बलरामने आपल्या जमिनीवर शेड बांधून त्याला ‘श्री शमशान संहिता’ असे नाव दिल्याचे उघड झाले आहे. स्मशानभूमीतून कवटी आणि हाडे आणून तो तंत्र मंत्र करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.