ऐन निवडणुकीच्या काळात प्रदेशाध्यक्ष ‘एन हरी’ यांचा खुलासा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) पुढील आठवड्यात मतदान पार पडणार आहे. मात्र मतदाना आगोदर मोठ घडामोडी पाहिला मिळत आहे. “कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) ४० जागा लढविणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपला (BJP) अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी देत काँग्रेस आणि इतर पक्षात प्रवेश केला आहे. तर काही नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असून त्यांना पक्ष टिकीत देणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने एंट्री केल्याने राजकीय पक्षांचो धाबे दणाणले आहेत आहेत. भाजप, काँग्रेस, जेडीएस यांनी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी देखील लवकरच कर्नाटक निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष एन हरी (N Hari) यांनी शनिवारी माध्यमांना याबाबत माहिती दिली ते म्हणाले, “आमच्या संपर्कात भाजपचे चार ते पाच आमदार आहेत. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बैगलुरुचे माजी महापौर सुध्दा आमच्या संपर्कात आहेत, असे एन हरी यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.