खुशखबर; खाद्य तेल झाले स्वस्त !

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढत असतांना एक खुशखबर ग्राहकांसाठी आहे. खाद्यतेलाचे  भाव अगदीच गगनाला भिडले असतांना पुन्हा दिलासा मिळाला. खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा घसरल्या. केंद्र सरकारने (Central Govt) भरमसाठ तेलाची आयात केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. किचन बजेट बिघडता बिघडता वाचले. यापूर्वी ही खाद्य तेलाने सुवार्ता दिली होती. दूध, इतर खाद्यपदार्थ, अन्नधान्य, खाद्यान्न, अन्नधान्य याचे भाव मात्र अजून कमी झालेले नाहीत.

 

बाजारात भीतीचे वातावरण
खाद्यतेलाच्या रेकॉर्डब्रेक आयातीमुळे, स्थानिक तेल-तेलबियांच्या बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्ली बाजारात शनिवारी, तेल-तेलबियांच्या किंमतीत (Edible Oil Price) घसरण दिसून आली. मोहरी, सोयाबीन, कच्चे पामतेल (CPO), पामोलीन आणि कापसाच्या तेलाच्या किंमती घसरल्या. तर शेंगदाणा तेल, तेलबियांच्या किंमतीत कुठलाच बदल झाला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.