भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, नंदिनी गुप्ता ठरली फेमिना मिस इंडिया

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) ही २०२३ची फेमिना मिस इंडिया (Femina Miss India) ठरली आहे. अवघ्या १९ व्या वर्षी नंदिनीने हे विजेतेपद तिच्या नावावर केले आहे. नंदिनी राजस्थान, कोटा येथील आहे. तिच्यासोबत, दिल्लीच्या श्रेया पुंजा हिने फेमिना मिस इंडिया 2023 १ ली रनर-अप आणि मणिपूरच्या थौनाओजम स्ट्रेला लुवांग २ री रनर-अप ठरली आहे. फेमिना मिस इंडिया 2023 – इम्फाळ, मणिपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

फेमिना मिस इंडियाची 59 वा सोहळा यावर्षी खुमन लम्पक, इंफाळ, मणिपूरमध्ये येथील इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता. 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेला ग्रँड फिनाले समारंभ हा अनेक स्टार उपस्थित होते आणि सौंदर्याचा उत्सव साजरा करण्यात आला. भारताच्या फॅशन उद्योगात बदल घडवून आणण्याचा सुमारे सहा दशकांचा प्रसिद्ध वारसा, प्रभावशाली ब्युटी अॅम्बेसेडर तयार करणे आणि तरुण महिलांमध्ये सकारात्मक शक्ती क्षमता वाढविणे आणि त्यांना सक्षम बनवणे.

Leave A Reply

Your email address will not be published.