धक्कादायक; कार चालकाने ट्रॅफिक पोलिसाला २० किमी पर्यंत नेले फरफट

0

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

एका कारचालकाने पुन्हा एका ट्रॅफिक हवलदाराला फरफटत नेले. सदर घटना नवी मुंबईची (Navi Mumbai) आहे. नवी मुंबईत एका कार चालकाने ट्रॅफिक पोलिसाला जवळपास २० किमी पर्यंत बोनेटवरून फरफटत नेले. सुदैवाने यात ट्रॅफिक पोलिसाला कोणती दुखापत झाली नाही. याप्रकरणी आरोपी कार चालक आदित्य बेमडे याला अटक करण्यात आली आहे. आदित्य बेमडे हा नेरुळमधील रहिवाशी आहे.

आरोपी आदित्य बेमडे सिग्नल तोडून जात असताना ट्रॅफिक पोलिसाने (Traffic Police) त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने गाडी थांबवली नाही. तेव्हा ट्रॅफिक पोलिस कारच्या बोनेटवर आदळले. यासंबंधीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून ट्रॅफिक पोलिस कारच्या बोनेटवर स्वत:चा जीव वाचवताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.