आप्पासाहेब धर्माधिकारींना मिळालेली २५ लाखांची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

0

नवी, मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क

 

नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर पार पडलेल्या सोहळ्यात ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Dr. Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्रभूषण’ (Maharashtra Bhushan) सन्मानाने गौरविण्यात आले.या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल झाले होते. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते.२५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. मात्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कारात मिळालेली मानधनाची २५ लाख रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याची मोठी घोषणा केली.

मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जात असल्याचे मत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नसल्याचे धर्माधिकारी म्हणाले. आम्ही कामाची सुरुवात ही खेडेगावापासून सुरु केली. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्वाची असेल तर तिची जाहीरात करायची गरज काय आहे असे धर्माधिकारी म्हणाले. नानासाहेब वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते. माझा श्वास असेपर्यंत हे कार्य सुरु राहणार आहे. असं देखील ते यावळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.