गोलंदाज जोफ्रा आर्चर सामन्यातून बाहेर, अर्जुन तेंडुलकरला मिळू शकते खेळण्याची संधी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

थोड्याच वेळात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कलकत्ता नाईट रायडर्स (Kalcutta Knight Riders) यांच्यात सामना सुरु होणार आहे. त्याच संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर खेळणार नसल्याची माहिती समजत आहे. आधीच मुंबईची बॉलिंग प्रभावी नाही आणि त्यामध्ये जोफ्राच्या न खेळण्यामुळे एक पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला या मुंबईच्या अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. अर्जुन तेंडुलकर गेल्या तीन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र त्याला आयपीएलमध्ये अद्यापही पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही.

 

वास्तविक, मुंबईचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आधीच या सामन्यातून बाहेर पडला आहे. जोफ्रा आर्चर 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध संघाचा पहिला सामना खेळला होता परंतु कोपराच्या दुखण्यामुळे तो त्यानंतरच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या संघात जोफ्रा आर्चरच्या जागी अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी मिळू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.