प्यार मे हार… रोता क्यू हे यार ! आलाय ब्रेकअप विमा…

मिळतील चक्क इतके रुपये...

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जर तुम्हाला साथीदाराकडून प्रेमात धोका मिळाला तर नुकसान भरपाई मिळू शकते. तेव्हा नाजूक नातेसंबंधात अडचण आल्यास आता टेन्शन घेऊ नका, पैशांनी प्रेमाची किंमत करता येत नसली तरी जगण्यासाठी पैसा लागतोच की, नाही का? त्यासाठीच एक भन्नाट संधी सर्वांसाठी विशेषकरून युवांसाठी चालून आली आहे. कोरोना काळानंतर तर अनेक विमा कंपन्या (Insurance Companies) नाविन्यपूर्ण विमा योजना बाजारात आणत आहेत. हृदय विमा, आरोग्य विमा, जीवन विमा, कार विमा, गृह विमा ही यादी आता लांबलचक वाढली आहे. पण तुम्ही कधी प्रेमाचा विमा, हा शब्द ऐकला आहे का? तुम्ही म्हणाल, काय राव, असा कुठं विमा असतो का? हो, असा विमा बाजारात आला आहे.

जग झपाट्याने बदलत आहे. पण नाते घट्ट होत आहे. पण प्रत्येकवेळी, प्रत्येक व्यक्तीला सारखाच अनुभव येईल असे नाही. सोशल मीडियाच्या या जमान्यात झट की पट प्रेम होते आणि रात्रीतूनच ब्रेकअप पण होते. अशावेळी प्रेमाचा विमा मदतीला धावून येईल. हार्ट ब्रेक इन्शुरन्समुळे धोका मिळालेल्या पार्टनरला आर्थिक सहाय मिळते. इन्स्टंट प्रेमाच्या या जमान्यात प्रेम कितपत टिकेल याची शाश्वती दोन्ही पार्टीच देऊ शकते. या दोन्ही व्यक्तीत जर खटके उडाले तर ते वेगळे होऊ शकतात. अर्थात असे होऊ नये. पण झालंच तर , त्यांना प्रेमाचा विमा मदत करु शकतो. प्रेमात साथीदाराने धोका दिला, तो सोडून गेला. भांडण झालं आणि ब्रेकअप झालं तर हा विमा तुम्हाला नुकसान भरपाई देणार आहे. प्रेमभंग झाल्यावर विमा तुमच्या दुःखावर प्रेमाची फुंकर घालणार आहे. ही बाबच अनोखी आहे.

 

या कंपन्या देतात विमा

सॅफरन अथवा Pioneer या विमा कंपन्या इश्कवाला लव्हला विम्याचे संरक्षण देतात. म्हणजे दोघांनी या विमा पॉलिसीअतंर्गत ठराविक रक्कम जमा करणे आवश्यक असते. जर प्रेमात धोका मिळाला तर त्या व्यक्तीला प्रेमाचा विमा मिळतो. सॅफरन MONA म्हणजेच Move On NA या नावाने हा प्रेमाचा विमा मिळतो. तुम्ही या कंपन्यांच्या संकेत स्थळावरुन सविस्तर माहिती मिळवू शकता.

जाणून घेऊया हार्टब्रेक फंड

सोशल मीडियावरील भेटीनंतर एका मुलाने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने हार्ट ब्रेक फंडात दर महिन्याला काही रक्कम जमा केली. काही महिन्यानंतर त्यांना नाते टिकविणे जड गेले. या फंडातील अटीनुसार, ज्याने विश्वासघात केला. जो साथीदार सोडून गेला, त्याची रक्कम विम्यासहीत त्याच्या पार्टनरला देण्यात येते. या प्रकरणातील प्रेमवीरांनी काही ठराविक रक्कम दरमहा या हार्टब्रेक फंडात जमा केली. ही रक्कम दरमहा 500 रुपये जमा करत होते. दोघांचे मिळून या फंडात एक हजार रुपये जमा झाले. काही महिन्यानंतर या नात्यातून मुलगी बाहेर पडली. तिने प्रियकराला धोका दिला, असे गृहीत धरुन विमा कंपनीने गुंतवणूक विम्यासहीत नुकसान भरपाई म्हणून परत केली. मुलाला 25 हजार रुपये मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.