हेनरीने पाकिस्तान विरुद्ध रचला इतिहास… ठरला इतक्या क्रमांकाचा खेळाडू (व्हिडीओ)

0

 

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

वेगवान गोलंदाज मॅट हेनरीने विकेट हॅट्रिक घेत इतिहास रचला आहे. हेनरीने सामन्यात पाकिस्तानच्या इनिंगमध्ये १३ व्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर शादाब खान आणि इफ्तिखार अहमदला सलग दोन चेंडूवर बाद केलं. त्यानंतर हेनरीला १८ व्या षटकात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शाहिन आफ्रिदीला बाद करून हेनरीने विकेट हॅट्रिक घेण्याची कमाल केली. या कामगिरीनंतर हेनरी न्यूझीलंडकडून टी-२० मध्ये विकेट हॅट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. मात्र, पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ९४ धावांनी पराभव केला आहे.

https://twitter.com/Niche_Sports/status/1646971099379544064?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1646971099379544064%7Ctwgr%5E2832e660680bf0dde13d7216e37ea7c2b3adb0ac%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fkrida%2Fmatt-henry-takes-wicket-hat-trick-against-pakistan-becomes-new-zealand-player-to-make-this-record-in-t20-cricket-nss-91-3590981%2F

हेनरीच्या आधी जॅकब ओरम, टीम साऊदी आणि मायकल ब्रेसवेलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी विकेट हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला. साऊदीने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनवेळा विकेट हॅट्रिक घेण्याची कमाल केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.