कापसाच्या मुद्द्यावरून खडसे-महाजन यांच्यात खडाजंगी

0

मुंबई राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात गुरुवारी विधान परिषदेत चांगलीच खडा जंगी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कापसाला हमीभाव देण्यासंदर्भात मांडलेल्या २८९ च्या प्रस्तावा दरम्यान खडसे यांनी जळगावसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

खडसे यांनी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६ हजार रुपये अनुदान देण्यासोबतच अधिवेशन संपण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबतीत काय तो निर्णय जाहीर करा, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी मंत्री महाजन हे विरोधी पक्षात असताना कशाप्रकारे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते याची आठवण करून दिली. गिरीश महाजन यांनी दहा वर्षांपूर्वी कापसाला ६ हजार रुपये भाव मिळावा म्हणून १२ दिवसांचे आमरण उपोषण केले होते. त्यावेळी ते माझ्याकडे गयावया करत होते, असे खडसे यांनी सभागृहात सांगितले. तसेच गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या खरेच जवळचे आहेत का? याबाबत मला खात्री नाही, कारण ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असते तर ते कधीच जळगावचे पालकमंत्री झाले असते, असा चिमटा खडसे यांनी महाजनांना काढलायावर प्रत्युत्तर देताना मंत्री दाराने इथे आला आहात. तुमच्याकडे महाजन म्हणाले, मी कापूस उत्पादक मतदारसंघही राहिला नाही. स्वतःची शेतकऱ्यांसाठी १२ दिवसांचे उपोषण ग्रामपंचायत, नगरपालिकाही राहिली केले होते, हे खरे आहे. परंतु त्यावेळी नाही, असे प्रत्युत्तर महाजन यांनी खडसे काही जण माझे हे उपोषण सुटू नये यांना दिले. यावर खडसे आणि महाजन म्हणून प्रयत्न करत होते. आता काही यांच्यात चांगलीच जुंपली. अखेर जण माझ्या पालकमंत्रीपदाची काळजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या वादात करत आहेत. खडसे यांनी माझ्या पदाची हस्तक्षेप करत हे अधिवेशन संपायच्या काळजी करू नये.

 

प्रतिक्विंटल ६ हजार रुपये अनुदान जाहीर करा!

राज्यातील शेतकऱ्यांच्या घरात विक्रीविना कापूस पडून आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन तो आत्महत्या करण्याच्या वाटेवर आहे. या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कापसाला प्रतिक्विंटल ६ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली. सध्या जिनिंग आणि प्रेसिंगसुद्धा बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कापसाचे करायचे काय? तो जाळून टाकयचा की फेकून द्यायचा, ते तरी शासनाने एकदा सांगून टाकावे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना –

विधान परिषद सभागृहात जेव्हा जेव्हा एकनाथ खडसे व महाजन समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक घडत असते. गुरुवारी देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून महाजन व खडसे यांच्यात वाद झाला. हाच मुद्दा पकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या दोघांचा वाद म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ असा असल्याची टिप्पणी केली..

Leave A Reply

Your email address will not be published.