अखेर जि. प. च्या भरती प्रक्रियेला उद्यापासून प्रारंभ

0

जळगाव : गेल्या काही महिन्यापासून लांबत असलेल्या जि.पच्या भरती प्रक्रीयेला शासनाकडून ‘हिरवा कंदील’ मिळाला आहे. जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण १७ संवर्गांसाठी ५ ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. एका पदासाठी संपूर्ण राज्यात एकाचवेळी परीक्षा होणार असल्याने उमेदवारांनी शक्यतो एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जि.पची भरती प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीमार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रिया दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची ६२६ पदे भरली जाणार आहेत. भरती प्रक्रिया साठीची जाहिरात ५ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे.

६२६ जागांसाठी ५ ऑगस्ट पासून सुरू होणार भरती प्रक्रिया

ऑनलाईन पार पडणाऱ्या या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागातील यांनी दिली आहे. १७ संवर्गातील एकूण ६२६ पदे भरण्यात येणार आहेत.

भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे संपूर्णपणे पारदर्शकता या भरती प्रक्रियेत असणार आहे. उमेदवारांनी ठरवून दिलेल्या विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्हा परिषदेची संपूर्ण तयारी झालेली असून भरती प्रक्रिया योग्य व नियोजनबद्ध मुदतीत अर्ज करावेत. पद्धतीने पार पाडली जाईल अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्याउपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी दिली आहे.

भरती प्रक्रिया पारदर्शकपणेच राबविली जाणार

५ ऑगस्टपासून ६२६ पदांसाठी सुरू होणारी भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार असल्यामुळे या भरती प्रक्रियेत संपूर्णपणे पारदर्शकता असेल ऑ पद्धतीने होणाऱ्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांनी

— श्री. अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी,

जि.प. जळगाव

 

Leave A Reply

Your email address will not be published.