कांताई सभागृहात उद्या एकादशी निमीत्त ‘बोलावा विठ्ठल’ कार्यक्रम

0

जळगाव;- येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या औचित्याने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या ‘बोलावा विठ्ठल’ या कार्यक्रमाचे गुरूवार दि. २९ जून रोजी कांताई सभागृह येथे संध्याकाळी ६.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन ह्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे करण्यात आलेले आहे.

आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांचा पांडुरंगाशी भेटीचा दिवस. या भेटीची आस प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते. त्यासाठीच तमाम भावीक वारीच्या माध्यमातून विठू माऊली पर्यंत पंढरीला पोहोचतो. अनुभूती स्कूल व शहरातील अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने चिमुकल्या माऊलींनाही रसिकांच्या भेटीची आस निर्माण होत असते. देवशयनी एकादशी अर्थात आषाढी एकादशी या पावन दिनी भेटीचे निमित्त आहे. या अत्यंत देखण्या कार्यक्रमास रसिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.