गोदावरी सीबीएसई स्कुल जळगाव येथे आषाढी एकादशी साजरी

0

जळगाव ;- येथील गोदावरी सीबीएसई स्कुल जळगाव तसेच डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदा, भुसावळात विठू नामाचा गजर करीत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.जळगाव येथे गोदावरी स्कुल परिसरात टाळ,मृंदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली या दिंडीत चिमुकल्यांनी वारकर्‍यांच्या वेशभूषेत , टाळांच्या गजरात वातावरण भक्तीमय बनवले. विठ्ठल मंदिरात देवाची आरती करण्यात आली ,तसेच मुलांकडून समाजप्रबोधनपर नाटिका सादर करण्यात आली.यानंतर स्कुलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांचे हस्ते पूजन करण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ व सावदा
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळच्या विद्यार्थ्यांनी आनंदात साजरी केली आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्ताने विद्यार्थ्यांनी भुसावळ शहरात अष्टभुजा मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी यात्रा काढली. या दिंडीत चिमुकल्यांनी वारकर्‍यांच्या वेशभूषेत , टाळांच्या गजरात वातावरण भक्तीमय बनवले. विठ्ठल मंदिरात देवाची आरती करण्यात आली ,तसेच मुलांकडून समाजप्रबोधनपर नाटिका सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील तसेच शाळेतील शिक्षक गण उपस्थित होते .अत्यंत शिस्तपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.

शिशुवर्गाच्या पंढरीची वारी सावदयाच्या डॉ. उल्हास पाटील शाळेच्या दारी

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी बी एस ई. . स्कूल सावदा येथे शिशु वर्गातील विद्यार्थ्यांना पंढरपुर येथे आषाढी एकादशी निमित् जाणार्‍या वारकरी मंडळी अशा पोषाखात बोलावण्यात आले होते. व विठ्ठल रुक्मिणीच्या पूजनाचे आयोजन करण्यात आले होतेे. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या सौ. भारती महाजन यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन केले. आणि शाळेतील काही शिक्षका़ंनी देखील विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून हरी नामाच्या गजरात, पांडुरंगाच्या नामाच्या गजरात दिंडीची वारी निघाली . शिशु वर्गातील विद्यार्थ्यांनी घवघवीत प्रतिसाद दिला . विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत ही वारी शाळेच्या प्रांगणामध्ये नाचत होती . पाऊली खेळत होती. अशा प्रकारे हा दिंडी सोहळा डॉ. उल्हास पाटील स्कूलच्या दारी अतिशय आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. त्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या अध्यात्मिक मूल्यांची रुजवण व्हावी विद्यार्थ्यांना विठ्ठल रुक्मिणी हे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे हे समजले पाहिजे . त्याविषयीची मूल्य रुजली पाहिजे. म्हणूनच हा शाळेचा प्रत्येक कार्यक्रम साजरा करण्यामागचा उद्देश्य असतो आणि त्यासाठी सौ. भारती महाजन या प्राचार्यांचे अथक प्रयत्न या विद्यार्थ्यांच्या मूल्य जोपासण्यासाठी असतात. या कार्यक्रमांसाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी , शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वाचे सहकार्य लाभले . व दरवर्षी प्रमाणे यावर्षी हा सोहळा आतिशय आनन्दमय वातावरणात साजरा करण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.