एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वावडदे दिनांक 28 जून 2023 येथील एल.एच.पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज रोजी आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक जितेंद्र पाटील, वीरेंद्र पाटील, वैशाली पाटील, मुख्याध्यापिका जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सुजीता सोळंखे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई यांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शिक्षिका अश्विनी पाटील यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले. संगीत शिक्षक कुशराजे पवार आणि ग्रुप यांनी विठ्ठल-विठ्ठल हे गीत सादर केले. त्यानंतर सीनियर केजीच्या मुलींनी ‘येग येग रखुमाई’ या गीतावर सुंदर असा नृत्याविष्कार सादर केला. स्वाती जाधव आणि सुकन्या पाटील यांनी महाराष्ट्राची परंपरा आणि वारकरी संप्रदाय याविषयी अधिक माहिती व ओळख आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना करून दिली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘भक्त पुंडलिक’ व ‘श्री विठ्ठल’ यांची कथा नाट्यरूपाने सादर केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका अन्वेषा माहेश्वरी यांनी केले. त्यानंतर श्री विठ्ठल रखुमाईची पालखी व दिंडी सोहळा काढण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी धोती, कुर्ता, टोपी तर विद्यार्थिनींनी नऊवारी साडी असा वारकरी संप्रदायाला शोभेसा वेश धारण केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विशाल पवार यांनी केले. क्रीडा शिक्षक आनंद जाधव विद्यार्थी यांनी लेझीम द्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.