रावेर लोकसभेबाबत काँग्रेस पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा

0

जळगाव – आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणूकींसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत आज मलकापूर काँग्रेसचे पदाधिकारी तथा मलकापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ.अरविंद कोलते आणि डॉ.अरविंद खर्चे यांनी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची भेट घेतली.
या भेटीत रावेर लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढावी, या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात होणार्‍या नगरपालिका, जिल्हापरिषद या निवडणूकांबाबतही रणनिती कशी राहिल यावर मंथन करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.