कैलास खेर यांनी घेतला होता टोकाचा निर्णय ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या आयुष्यात सर्व काही सुरळलीत चालत असतानाच अचानक असा काही काळ येतो ज्याची आपण कल्पना सुद्धा केली कि डोळ्यात पाणी येत. आणि सामान्य माणसापासून तर प्रतिष्ठित व्यक्तीला ह्या सर्व उत्तर-चढावातुन समोर जावं लागत. तशीच काही स्थिती हि प्रतिष्ठित गायक कैलाश यांच्या सुद्धा आयुष्यात येऊन गेली आहे. आज कैलाश खेर (Kailash Kher) यांचे भारताताच नाही तर, परदेशात देखील चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आज अनेकांना कैलाश खेर यांनी गायलेली गाणी ऐकल्यानंतर प्रसन्न वाटतं, पण एक दिवस असा होता जेव्हा कैलाश खेर यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत कैलाश खेर यांनी त्यांच्या आयुष्याचं गणित सांगितलं आहे.

एका मुलाखतीत कैलाश खेर यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या संघर्षांबद्दल सांगितलं आहे. करियरच्या सुरुवातीला कैलाश खेर यांना अनेक गोष्टींचा सामना कराला लागला. आपण उत्तम गायक होऊ शकतो याची कल्पना देखील कैलाश खेर यांनी केली नव्हती. कैलाश खेर यांनी अनेक नोकऱ्या केल्या. जेव्हा कैलाश खेर २१-२२ वर्षाचं होते तेव्हा त्यांनी एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला पण, त्यामध्ये कैलाश खेर यांना यश मिळालं नाही

आयुष्यात आलेल्या संकटांना कंटाळून कैलाश खेर यांनी गंगा नदीमध्ये उडी मारली, पण त्याठिकाणी एका व्यक्तीने कैलाश खेर यांचे प्राण वाचवले. गंगा नदीच्या काठी ज्या व्यक्तीने कैलाश खेर यांचे प्राण वाचवले ते गायकाला प्रचंड ओरडले आणि जगण्याचा खरा हेतू सांगितला. त्यानंतर कैलाश खेर यांनी त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यामागचं कारण सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.