ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे २६ व २७ जून रोजी आयोजन

0

जळगाव;- ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे २६ व २७ जून, २०२3 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारणपणे १० वी व १२ वी ग्रॅज्युएट / आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण १७१ रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे.

या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायेजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नांव नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन ॲप्लाय करावा.

काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते स॔ध्या ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढील दोन वर्षे निशुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधितांना व्यवसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, मार्केट लिंकेजेस, इक्विटी ग्रॅन्ट, प्रोपोझल, शेतकरी उत्पादक कंपनी निगडीत योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत शासकीय अधिकारी इतर स्टेक होल्डर यांच्या मध्ये समन्वय साधने इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहे. अवश्यकता असल्यास या संस्थांना कालानुरूप विविध नाविन्यपूर्ण विषयाचे पुन्हा पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीच्या आधारे प्रशिक्षणाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या वतीने या योजनेचा अधिकाअधिक लाभ शेतकरी उत्पादक कंपनींनी घ्यावा असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे तसेच सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती. अहिरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.