सैनिकी मुला/मुलींचे वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

0

जळगाव ;- येथील सैनिकी मुलांचे मुलींचे वसतीगृहात प्रत्येकी ४८ मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक / विधवा जळगाव शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य जळगाव येथे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पाल्यांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रँक प्रमाणे भोजनखर्च आकारले जाते व विधवांच्या पाल्यांना सदर वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेश जागा शिल्लक राहिल्यास इतर नागरीक पाल्यांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तीका / अर्ज वसतीगृह अधिक्षक / अधिक्षीका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.

तरी इच्छुक माजी सैनिक/ विधवांच्या पाल्यांनी वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधिक्षक/अधिक्षिका यांचेकडून प्रवेश पुस्तीका / अर्ज खरेदी करुन आपला अर्ज त्यांचेकडे दिनांक १० जुलै, २०२३ पर्यंत सादर करावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रविंद्र भारदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय वसतीगृह अधिक्षक श्री. भिमराव पाटील मो. नं. ९४२१६१३५४३ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८

वसतीगृह अधिक्षीका श्रीमती अनिता पाटील मो. नं. ८७८८२४५२८२ किंवा दूरध्वनी क्र. ०२५७ -२२४१४१४ वर संपर्क साधावा. असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढील दोन वर्षे निशुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधितांना व्यवसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, मार्केट लिंकेजेस, इक्विटी ग्रॅन्ट, प्रोपोझल, शेतकरी उत्पादक कंपनी निगडीत योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत शासकीय अधिकारी इतर स्टेक होल्डर यांच्या मध्ये समन्वय साधने इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहे. अवश्यकता असल्यास या संस्थांना कालानुरूप विविध नाविन्यपूर्ण विषयाचे पुन्हा पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीच्या आधारे प्रशिक्षणाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या वतीने या योजनेचा अधिकाअधिक लाभ शेतकरी उत्पादक कंपनींनी घ्यावा असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे तसेच सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती. अहिरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.