जळगाव शहरातील पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलला

0

जळगांव;- शहरातील नागरीकांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या, जळगांव यांचे मार्फत महापारेषणचे १३२ केव्ही उपकेंद्रात देखभाल व दुरुस्तीचे कामे करणेकामी वाघुर पंपींग येथील विज पुरवठा दि.१७ रोजी सकाळी १०. ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याने दि.१७ रोजी होणारा पाणी पुरवठा बंद राहील.

त्यामुळे जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यांत येत असून दि.१७ रोजीचा पाणी पुरवठा दि.१८/ रोजी करण्यांत येईल.तसेच दि.१८ रोजी व १९ रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे दि.१९ व २० रोजी करण्यात येईल. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने कराबा व महापालिकेस सहकार्य करावे असे पाणी पुरवठा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.