जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ने आज जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर केला आहे.

या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी 75 टक्के गुण तर एसीसी, एसटी, अपंग व्यक्तींसाठी 65 टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे.

विद्यार्थी http://jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करुन निकाल पाहता येईल.

या वर्षी जेईई मेन परीक्षेच्या (JEE Main Result 2022) तारखांमध्ये काही बदल करण्यात आला होता. साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये जेईई मेन परीक्षा घेण्यात येते. पण यंदाच्या वर्षी परीक्षेची तारीख आधी मे महिना आणि त्यानंतर जून महिन्यात पुढे ढकलण्यात आली होती. जेईई मेन पहिल्या सत्राची परीक्षा 20 जून 2022 ते 29 जून 2022 या कालावधीत घेण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.