आग्रा किल्ल्यात थाटात साजरी होणार शिवजयंती…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आग्र्याहून सुटका हि बातमी जितकी त्यावेळी स्वराज्यातील (Swarajya) प्रत्येकासाठी आनंदाची होती तितकीच आनंददायी बातमी आता छत्रपती शिवरायांच्या शिवभक्तांसाठी आली आहे. कारण आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र सरकार सहआयोजक होण्यास तयार झालं आहे. त्यामुळे आग्रा किल्यावर दिमाखात शिवजयंती साजरी होणार आहे.

राज्य सरकार सहआयोजक असेल तर आग्रा येथील किल्ल्यात शिवजयंती साजरी करायला परवानगी द्यावी. राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारला पत्र दिले तर परवानगी मिळेल, असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने दिले होते. त्यानंतर आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती (Shivjayanti) साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार देखील सहआयोजक होण्यास तयार झालं आहे.

आर. आर. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र पुरातत्व खात्याने त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता न्यायालयाने राज्य सरकार (Maharashtra Government) सहआयोजक असेल तर परवानगी मिळेल असे म्हटले होते.

दरम्यान, राज्य सरकार सहआयोजक होण्यास तयार झाल्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये आनंद पसरला आहे.

दरम्यान पुरातत्व खात्याने स्पष्ट केले होते की ‘परवानगी देण्याचे सर्व अधिकार महासंचालकांचे आहेत. खासगी कार्यक्रमांना परवानगी देता येणार नाही असा नियम आहे. कार्यक्रमासाठी परवानगी हवी असेल तर राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा’.

या प्रकरणावर सुनावणीदरम्यान हायकोर्ट म्हणाले होते, ‘राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी द्यायला काही हरकत नाही. त्यासाठी राज्य सरकारकडून उत्तर प्रदेश सरकारला पत्र जाणे आवश्यक आहे. त्यानंतरही पुरातत्व खात्याने परवानगी दिली नाही तर मग पुन्हा आयोजकांना कोर्टाचे दरवाजे खुले आहेत’.

Leave A Reply

Your email address will not be published.