लायन्स क्लब जळगावतर्फे मूळजी जेठा महाविद्यालयाला व्हिल चेअर आणि वॉकर भेट

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
लायन्स क्लब जळगावतर्फे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ड्रीमि आईज रिसोर्स सेंटर फॉर डिफ्रंटली एबल्ड, या सेंटरला व्हिल चेअर आणि वॉकर देणगी स्वरूपात देण्यात आले. या प्रसंगी सेंटरमार्फत त्यांच्या सत्कारासाठी एक सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात के. सी. ई. सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे संचालक डॉ. हर्षवर्धन जावळे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, लायन्स क्लबच्या अध्यक्ष किरण गांधी, सेक्रेटरी प्रशांत चंदिवाल व लिओ क्लबचे सदस्य नयन गांधी व विनोद राका आणि सेंटरचे प्रशासकीय समन्वयक व्ही एस कंची व शैक्षणिक समन्वयक सहा. प्रा. आकाश राठोड व मूळजी जेठा महाविद्यालयाच्या दिव्यांग समितीचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.