खडसेंना भोसरी भूखंड प्रकरणी मोठा दिलासा

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी पुणे एसीबीला पुरवणी आरोपपत्र दाखल न करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहे. 20 मार्चच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी क्लीन चीट दिल्याने दाखल केलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावरून न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.