विवादित “काऊ हग डे” निर्देश केंद्राने घेतला मागे…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जागतिक प्रेमदिन म्हणून १४ फेब्रुवारी हा सर्वांना चांगला ठाऊक आहे. हा दिवस संपूर्ण जगात आणि भारतातही साजरा केला जातो. मात्र, भारतात प्रेमदिनाला कायमच विरोध होतो. हा विरोध आता सरकारच्या पातळीवरदेखील होत आहे. त्याचे कारण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी एक पत्र काढून १४ फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिल्याचे या परिपत्रकात सांगितले होते.

‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day) च्या बदल्यात केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. तसे पत्रदेखील या विभागाच्या वतीने काढण्यात आले होते. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. तसे निर्देश देणारे एक परिपत्रकही काढण्यात आले होते. मात्र सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका करण्यात आली. याच कारणामुळे केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला आहे. केंद्रीय वन्यजीव संरक्षण महामंडळाने तसे निर्देश दिले आहेत.

बोर्डाचे सचिव एसके दत्ता यांनी नव्या निवेदनात सक्षम प्राधिकारी आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारतीय पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी गाय आलिंगन दिन साजरा करण्यासाठी जारी केलेले अपील मागे घेण्यात आल्याचे सांगितले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.