जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर तालुक्यातील टाकळी शिवारातील शेतातील बंद घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण २ लाख ५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जामनेर तालुक्यातील टाकळी येथे सुरेश भरत परदेशी (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्याचे टाकळी शविारातील शेत गट नंतर १२/१ मध्ये शेत आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेतात त्यांनी घर बांधले आहे. २० मे रोजी रात्री १० वाजता सुरेश परदेशी यांनी शेतातील घर बंद करून घरी गेले होत.
दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातील बंद घर फोडून घरातील कपाटात ठेवले ७० हजार रूपयांची रोकड आणि १ लाख ३५ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकुण २ लाख ५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.
याप्रकरणी सुरेश परदेशी यांनी जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहे.