गांधी उद्यानाजवळून डॉक्टरची दुचाकी लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील महात्मा गांधी उद्यानाजवळून एका डॉक्टरची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शास्त्री नगर येथील रहिवासी असलेले क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते डॉक्टर असून वैद्यकीय सेवा करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २८ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील महात्मा गांधी मार्केट समोरील बगिच्या जवळ ते (एमएच १९ एडब्ल्यू ५५५९) क्रमांकाच्या दुचाकीने आले. दुचाकी पार्क करून खासगी कामासाठी निघून गेले.

दरम्यान, त्यांनी पार्किंगला लावलेली ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. भालेराव यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. रविवारी २९ मे रोजी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.